हातमोजे (Handgloves ) प्रकार व उपयोग

 सोयाबीन हातमोजे (Soyabin Handgloves )

सोयाबीन हातमोजे(Soyabin handgloves)
सोयाबीन हातमोजे

मित्रांनो,  

                या प्रकारचे हातमोजे वापरून आपण अगदी सहजपणे सोयाबीन काढू शकतो.या हातमोज्यांना (Handgloves ) ला तळ हाताकडील बाजूस रबरी आवरण आहे ज्यामुळे धारदार काटे किंव्हा दसकट हाताला टोचणार नाही , आणी मागील बाजूस कापड आहे ज्यामुळे बराचं वेळ काम करून सुद्धा हाताला घाम येणार नाही. 

         आता मार्केट मध्ये नवीन प्रकारचे हातमोजे दिसतात,ज्यांचा कलर वरील फोटो पेक्षा वेगळा दिसून येईल तसेच त्याच्या गुणवत्तेत फरक दिसून येईल. सर्वात महत्वाची माहिती अशी जी कोणाला माहित नसावी जी सांगावीशी वाटते ती म्हणजे या हातमोजे ची जोड आहे त्या मध्ये 60 GSM जाडी असलेली चा रेट आणी 80 GSM जाडी असलेली जोडी चा रेट वेगळा असतो.



लेदर हातमोजे

मित्रांनो,
             या प्रकारचे लेदर हातमोजे (Leather Handgloves) 
हेवी कामासाठी वापरले जात असून ते लोखंडी पत्रा , सळई बार इ. कामासाठी जास्त वापरले जातात. यांची किंमत ₹80 ते ₹100 असू शकते. या हातमोजाची टिकायची क्षमता जास्त असून बरेच महिने वापरून सुद्धा त्यांना काहीच होत नाही.

रबरी हातमोजे 

मित्रांनो, 
            या प्रकारचे हातमोजे सर्व प्रकारच्या कामात वापरले जातात जसे बांधकाम कामगार, शेतकरी,केमिकल कंपनीमध्ये , कचरा गोळा करताना, घरगुती वापरासाठी याचा वापर केला जातो. असे हातमोजे हलके व जाड असतात त्यानुसार त्यांची किंमत ठरवली जाते. ₹40 ते ₹90 पर्यंत यांच्या किमती असतात तसेच प्रत्येक हार्डवेअर दुकानामध्ये ते उपलब्ध असतात.









Thank you Everyone

Comments